लाचार मन विकारी

व्यसन नाही खंडाचे न खाल्ली कधी सुपारी,
हिच्या पुढे मात्र लाचार हे मन विकारी.

विरह हिचा आम्हास आणी गुडघ्यावरी,
हिला सोडणे मात्र न येई कधी विचारी.

हिच्या पाशातून सोडवण्यास घरी झाले कित्येक प्रयास
उकीर्ड्याची चव मात्र येईल कशी घरच्या अन्नास?

स्वच्छतेचे सारे नियम ही झिडकारी
हिच्या साठी करू पारसदाराची आम्ही वारी.

जरी फैलवी बिमारी तरी चव हिची न्यारी
प्राणाहून प्रिय आम्हास ठेल्यावरची पाणीपुरी!

No comments:

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.