माझ्या रुमालामध्ये
उरला मोगर्याचा गंध
त्याच्या सुवासाचा मला
लागला आगळाच छ्न्द
जणू सारे मर्मबन्ध
मोगर्याचा हा सुगंध
जणू माझ्यातला मी
रित्या देहात हा बंद
रुमालातला हा गंध
कधी माझ्यातली शक्ती
कधी फाटले आकाश
उरे तुझीच रे भक्ती
-केतकी
No comments:
Post a Comment