आम्ही दोघ लोळत पडलो होतो बिछान्यात,
डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊनऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.
जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते
,
जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते
,
"लग्न मानवलेल दिसतय तुला. चांगलीच जड झालीयेस!"
आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,
"मला तरी एक कारण आहे. तू का थकुन जडावला आहेस?"
त्यानी ते खरेच ऐकले की काय?
म्हणाला,"भार वहातो आहे तुझ्या काळज्यांचा"
किती गंमत ना?
मी थकले त्याचा भार वाहून आणि तो थकला माझा भार वाहून.
मी आणि माझा थकलेला क्षण
मग नुसतच बोलत राहिलो मूकपणे आढ्याकडे एक टक पहात....
No comments:
Post a Comment