आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं,
एका क्षणात मनाने थेट कॉलेज गाठलं.
बेटं कारमधे जेमतेम पाच मिनीट वाजलं,
पण पूर्वीइतकच आजही ते मनाला भावलं.
सिनेमाचा मला तसा फारसा छंद नव्हता,
हा सिनेमा मात्र मी तीनदा पाहिला होता.
याच्या गळ्यात गळा कधी घालता आला असता,
तर लुब्रा एकटेपणा कधी जवळही फिरकला नसता!
No comments:
Post a Comment