गझल


गझल कशी लिहावी ती मला कळलीच नाही.
विनंत्यांना माझ्या ती कधी भुललीच नाही.

भराभरा जळाले सरण संसार वणव्यात
काही ओली लाकडे यात जळलीच नाही.

होता नव्हता पसारा मांडला तिच्यासाठी
प्राक्तने का दोघांची कधी जुळलीच नाही.

माझ्याच गुंत्यात आता अडकलो मी पुरता
आयुष्याची वीण मला कधी जमलीच नाही.

भुमिपुत्र

न बळ माझ्या अंगी न कुठला राजयोग,
या बळीराजाच्या नशीबी फक्त वनवासाचा भोग.

सोनेरी त्या हरीणाने पदोपदी मजलाही फसवले,
आक्रोश ऐकूनही माझा न कुणी लक्षमण सरसावले.

लदलदलेल्या अशोकवनात या कैकदा माझी इज्जत लुटली,
बरबटलेल्या लंकेत तेव्हा माझी चिता तेवढी पेटली.

न झाला संहार त्या राक्षसांचा, न केला कुणी त्यांचा निःपात,
आधी त्यांनी खाल्ला आजा, आज सरणावर गेला बाप.

अग्निपरिक्षेच्या दिव्यानंतरतरी गायले गेले सीतेचे स्तवन,
आम्हा भुमिपुत्रांच्या नशिबी आले नुसतेच आत्मदहन.

आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं


आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं,
एका क्षणात मनाने थेट कॉलेज गाठलं.
बेटं कारमधे जेमतेम पाच मिनीट वाजलं,
पण पूर्वीइतकच आजही ते मनाला भावलं.
सिनेमाचा मला तसा फारसा छंद नव्हता,
हा सिनेमा मात्र मी तीनदा पाहिला होता.
याच्या गळ्यात गळा कधी घालता आला असता,
तर लुब्रा एकटेपणा कधी जवळही फिरकला नसता!


भार

आम्ही दोघ लोळत पडलो होतो बिछान्यात,

                                           डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन


ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.


जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते
,
"लग्न मानवलेल दिसतय तुला. चांगलीच जड झालीयेस!"

आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,

"मला तरी एक कारण आहे. तू का थकुन जडावला आहेस?"

त्यानी ते खरेच ऐकले की काय?

 म्हणाला,"भार वहातो आहे तुझ्या काळज्यांचा"

किती गंमत ना?

 मी थकले त्याचा भार वाहून आणि तो थकला माझा भार वाहून.

मी आणि माझा थकलेला क्षण 

मग नुसतच बोलत राहिलो मूकपणे आढ्याकडे एक टक पहात....

त्याचे चेहरे हजार

मन लोह लालबुंद
मन चरचरणारा थेंब

मन साजण मोहक
मन दारुण दाहक

मन स्वप्नांचा बाजार
कधी अशक्त लाचार

मन दिवाभित भित्रा
लाळ घोटणारा कुत्रा

त्याचे हजार विचार
आता मोजता येईना

त्याचे चेहरे हजार
मना एकही भावेना
-केतकी

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले
वहावणार्या मनास माझ्या तू कधीच का न रोखले?

शब्दात तुझ्या धुंद होत हरवले स्वतःस मी
शब्दात तुझ्या हरवताना दुरावले जगास मी

गुंजले जे शब्द ह्रुदयी गीते मी त्यांची गायली
गाशील ती गीते कधी तू वाट किती मी पाहिली

पुरे हा शब्दांचा खेळ आता, घे काळीज झेल माझे
तुटता ते आर्ततेने पापणीही तुझी ना लवली!

भय इथले संपत नाही..मला कळलेले (थोडे अपूर्ण)

>भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
>मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

आज या कातरवेळी मला अनामिक भीती वाटते आहे. (येथे सोबत कुणीही नाही) मला तुझी आठवण येते आहे. तू आज माझ्या जवळ नाहीस पण तू शिकवलेल्या गीतांच्या सहवासात, तू सोबत असल्यासारखे वाटून कदाचित माझे भय दूर होईल.


>हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
>झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हे झरे, हा चंद्र आणि लालीमा पसरलेल्या आकाशात गुरफटलेली धरा मला तुझी आठवण करून देत आहेत. तू जशी राख होऊन झाडांन मध्ये विखुरलीस तसा मी पण लयास जाईन पुन्हा या जगात यायला. (***दोन ओळी स्वतंत्र वाटताहेत पण त्या तश्या नसाव्यात. त्यातला संबंध लक्षात येत नाही आहे).


>त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
>क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

या सांजवेळी हा गुदगुल्या करणारा वारा आज स्वतःच हसतो आहे असे वाटते (तुझ्या आठवणीने मन प्रफुल्लीत झाल्यामुळे चोहुकडे आनंदमय वाटते आहे.) वितळणार्या सूर्याचा रसरशीत रंग लेऊन ही समुद्राची भरती जणू आकाशच घेऊन आली आहे.


>तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
>सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

मैथिलीला श्रीरामाच्या शेल्याच्या नुसत्या स्पर्शानेदेखील ज्याप्रमाणे वनवासाचा विसर पडावा त्या प्रमाणे तुझ्या हळव्या आठवणी माझ्या रुक्ष आयुष्यात हिरवळ आणतात.


>देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
>थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

आयुष्याचा संपूर्ण टप्पा न गाठता तू मधेच अशी निघून गेलीस (देऊळ म्हणजे वार्धक्य जेथे आपल्या कर्माचे, आयुष्याच्या फळाचे अर्घ्य ओंजळीतून वाहून स्वाः म्हणत स्वतःला मोकळे करायचे असते तसे न करता ते देऊळ यायच्या आधीच तुझ्या ओंजळीने अर्घ्य वाहून टाकले). तुझ्यावीण मी एकटा आणि हळवा झालो आहे.


>संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
>देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

(परंतु) तुझ्या आठवणींनी मला आज तृप्त केले आहे. सायंकाळी फुलून येणार्या कमळासारखा मी पण फुललो आहे. या निशेच्या निळ्या शाईत माखलेली वनराई हळू हळू माझा देह लपेटून घेते आहे.


>स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
>हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

जरी समाधानी मी आज तुझ्या आठवणीत तरी माझे गात्रन्गात्र तुझ्यासाठी झुरते आहे (ते फक्त तुझाच जप करतात). तुझ्या आठवणी जरी शीतल असल्या तरी तुझी कमतरता सतत जाणवते आहे. (तुझ्या शिवाय हे आयुष्य म्हणजे एक काळी रात्र आणि तुझ्या आठवणी म्हणजे शीतल, चमचमत्या चांदण्या. ही रात्र सरता सरत नाही आहे).


>ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
>मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


आली लहर की केला कहर

आपल्याला बुवा सूर्यापेक्षा चंद्र जास्ती आवडतो,
चन्द्राला routine मधून जरातरी break मिळतो.

नदीने समुद्रास मिळणे, चंद्रामुळे कमळान्नी उमलणे किती रे ते predictable!
लाजाळूला हात लागताच त्याचे लाजणे how typical!

सांगा त्या कोळ्याला कधी जाळे सोडून भटकायला,
दवबिन्दून्ना कधीतरी तरी अघळपघळ पसरायला.

चाकोर्या आखल्यास देवा तरी आयुष्य ठेव थोडे flexible,
आली लहर की करावा कहर म्हणे ना का कोणी मग मला whimsical!

ती, मी आणि फोन


तिचा माझा contact आता phone वरच होतो.
'कशी आहेस ग?', 'मी बरी' च्या पुधे मोठ्ठा pause येतो.

वेळ नाही म्हणुन हल्ली मी drive करताना phone करते,
Police आडवा गेला म्हणून phone न सांगताच कापते.

कधी 'कामात busy आहे ग. परत phone करतेस का'? हे ती मला विचारणार,
'नक्की करते' म्हणून कामाला जुंपल्यावर मी phone करण विसरणार.

पुन्हा phone केला असता मी 'वेळ आहे का ग?' विचारायाच.
हे उपचार पाळताना माझ्या उत्स्फुर्त शब्दांनी रुसायच.

phone ठेवल्यावर उसासा टाकत जुन्या आठवणी काढायच्या,
कधी काळी phone तू पहिले ठेवावास म्हणून आमच्यात वाद व्हायचा.

खरच जवळ आहोत अजूनही की नुसताच आव आणलेला?
आमच्या मैत्रीचा धागा आज दोन जगात ताणलेला.

माझ्या शब्दांनो


शब्दांनो, कधी जमले तर करा तुमच्या आयुष्याची गोळाबेरीज.
जरा बघा तरी काय झाले तुमच्या अयुष्याचे चीज.
माझ्यासारखे शरीर मिळले तुम्हास  कधीजर का,
तर मारुन या कधी तुम्ही वसवलेल्या जगाचा फेरफटका.

दिसेल तुम्हाला एक  घर चिमुकले,
तुमच्या हुंकरांनी लिंपलेले,
अंगणात सजली असेल तुमच्या बडबडगीतांची रांगोळी,
घरातल्या प्रत्येक तसबीरीत साठवली असेल तुमची आरोळी.

सप्तरंगी पायवाटेवरुन असे जर गेलात समोर तर दिसेल तुम्हाला एक बाग.
प्रेमात घेतलेल्या आणाभाकान्नी चढवला असेल तिला  साज.
फुलली असतील त्यात तुमची वचने, मित्रांसोबत गायलेले गाणे,
रंगलेल्या गप्पा, हसणे, खिदळणे आणि क्वचित रुसणे फुगणे.

दर्यांमधे दिसेल रान नटलेले,
रानामधले प्रत्येक पान दवानी चिंब भिजलेले.
वसतात तेथे तुम्ही केलेली कौतुके, आदरोद्गार काढलेले,
तुम्ही केलेला जल्लोष, तुमचे धीराचे हात पाठीवरुन फिरलेले.


त्या डोंगरा पलिकडे आहे एक मोकळे मैदान.
नेहमीच नव्हते ते एवढे रूक्ष.
ती कापलेली खोडे दिसताहेत ना? तिथे होती बरीच वृक्ष.
नांदत होते इथेही बरेच जीव, माजली होती इथे वृक्षावल्ली.
काय करणार पण त्यांची रीत तुम्हाला नाही पटली.
एक दिवस सारी वनराई तुम्ही ऐसी दणाणुन सोडली,
एक एक करत करवतीने तुम्ही हरेक फांदी छटुन काढली.
जगाची रीतच ती, काय करणार? इथेच थोडावेळ थांबणार की पुढेही चालणार?


पुढे दिसताहेत का ती गिधाडे घालताना रिन्गण?
तिथे आहे तुम्ही गाजवलेले रणांगण.
येथे जे विव्हळत पडले यातले काही आहेत तुमच्यापैकीच,
पाजळल्या तुम्ही येथे तलवारी विजयाच्या कैफीत.
गलीतगात्र झाले काही, कधी वाटेत तेही भेटतील.
त्यावेळेस मात्र त्यांच्या खंजीरी थेट हृदयाचा ठाव घेतील.

काय म्हणता? सहन होत नाही हे विव्हळणे? पायातले त्राण गाळाले?
हळूवार घ्या श्वास, बसा क्षणभर त्या कड्या मागे.
येथुन दिसतील तुम्हाला नदीच्या हिरकणी लाटा,
वितळुन पसरणारा रवी आणि त्याच्या असंख्य छ्टा.
या दृश्यांच्या कवेतच मिळेल तुम्हास मुक्ती.
आमच्या सारखे जीव मात्र या सुटकेस मुकती.





क्रांतिका झंडा

मॅडमने जब छोड़ी दिल्ली
जाग उठी तब भिगी बिल्ली.

जनताने जब आवाज़ लगाई,
जनपथसे बिल्ली गुर्राई.

"सरकारके खिलाफ गर करो प्रचार,
भेजेंगे तुम्हे जेल तिहार."

किसीने फ़ाहराया तब ऐसा क्रांतिका झंडा,
जाग उठा भारतका बाशिंदा.

हर बुढा, हर बच्चा लगाये अब यही नारे,
आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं अण्णा हज़ारे!

बिल्ली, शेर न तुम अब कभी बनोगी.
अब बस यह सोचो इस आँधीसे तुम कैसे बचोगी?

दिग्गी राजा, तुने हद कर दी

दिग्गी राजा, तुने हद कर दी.

राजनीती जैसे संगीन विषय को बना दिया comedy!


हर रोज देके बेतुकासा statement media को,

चुल्लूभर पानीभी न रखा पार्टीवालोंको डूब मरनेको!


media के इस गलत focus के आज उठाओगे चस्के.

कल सब चले जानेके बाद न घरके रहोगे न घाटके.


सबकी नज़रोंसे और कितना गिरोगे?

अपनी बौद्धिक कंगालीका ढिंढोरा और कितना पिटवाओगे?


समय हैं अभीभी बचालो जो हैं बची.

High command के सपने छोड़ सेवा करो मध्य प्रदेशकी.

लाचार मन विकारी

व्यसन नाही खंडाचे न खाल्ली कधी सुपारी,
हिच्या पुढे मात्र लाचार हे मन विकारी.

विरह हिचा आम्हास आणी गुडघ्यावरी,
हिला सोडणे मात्र न येई कधी विचारी.

हिच्या पाशातून सोडवण्यास घरी झाले कित्येक प्रयास
उकीर्ड्याची चव मात्र येईल कशी घरच्या अन्नास?

स्वच्छतेचे सारे नियम ही झिडकारी
हिच्या साठी करू पारसदाराची आम्ही वारी.

जरी फैलवी बिमारी तरी चव हिची न्यारी
प्राणाहून प्रिय आम्हास ठेल्यावरची पाणीपुरी!

गहिर्या लकिरी

माझ्या तळहातावरून रेषा वेड्या वाकड्या धावी
कुठल्याश्या झाडाची मूळे जणू जमिनीत खोल रुतावी.

यांचं आयुष्य जगते मी की या माझ्यामुळे जगतात?
माझ्या गतजीवनातून प्राण शोषतात की या माझ्या भविष्यावर तगतात?

गहिर्या या लकीरीन्शी नातं आहे माझं गहिरं
मला त्यांची सोबत असते, त्यांना तरी आहे कोण दुसरं!

कळून वळेना

पायाखालच्या वाटेलाही पाय एकदा फुटले
तोल माझा जाऊन डोळ्यातले अश्रू धावत सुटले


स्वप्नांनाही पडली स्वप्नं स्वप्नांच्या दुनियेची
पायाखालच्या वाटेला सोडून दूर गगनी उडायची
 
मन मात्र मनापासून स्वप्नं खरी मानेना
गुडघ्यात घातलेली मान वर काही काढेना 

कोणाची घालू समजूत हे माझेच मला समजेना 
माझेच आहेत हे खेळ सारे कळूनही मला वळेना

अन्धेरनगरी


अन्धेरनगरीचा चौपट राजा,
राजापेक्षा येथे सल्लागाराचा गाजावाजा 
राजाच्या हातात सत्तेचे नुसतेच गाजर 
सल्लागाराच्या वंशावळीची सत्तेवर नजर.

अंधेरनगरीत एकदा व्यापाराला आला उत
मंत्र्या-संत्र्यांनी केली दोन्ही हातानी लूट.
पोटा साठी राबणारा येथे राब राब राबणार,
त्याच्या नशिबी मात्र दररोजचे मरण येणार.

प्रजा म्हणे 'मी एकटा तरी काय करणार?
माझा कोणी मरत नाही तोवर मी नाही पहाणार.'
अंधेरनगरीत काही जणांची मात्र झोप उडाली,
त्यांनी सरळ दुसरी नगरी गाठली.

अंधेर नगरीच्या प्रजेचेही डोके पडले गहाण,
या अराजकातही म्हणे 'मेरा भारत महान!'

सुखसोयींचा पाठलाग

'सुखसोयी' हा शब्द आपण सहज एकत्र म्हणतो,
Facebook ची सोय असताना कट्ट्याचे सुख शोधतो.
Email ची सोय असूनही पत्रासाठी झुरतो,
हातात coke असताना कटिंगचे स्वप्न पहातो.

सोय आणि सुखाचा पाठलाग पाहून मला कुत्रा आणि शेपूट आठवते. 
सोय शिताफीने सुख धरायला जाते 
आणि सुख तेवढ्याच चपळाईने निसटते.

आई-बाबांचे म्हणणे मग आठवते पदोपदी
'तुमच्या सारख्या सोयी नसल्या तरीही, बाळांनो,
 होतो आम्ही भरपूर सुखी.'
आम्हीही आमच्या बाळांना हेच सांगणार,
'सोयींच्या या गर्दीत, बाबांनो, सुख नाही गवसणार.'

आजोबांची कवळी


आजोबांची कवळी सहसा डब्या मधेच रमे
तिला हवा लागणार कळताच नातवंडांची गर्दी जमे.
कवळी कडे पहात असे ती डोळे विस्फारत 
आजोबाही ते पाहून मिस्कीलपणे हसत.

आजही कोणी कवळीचे नाव घेता आठवतो तो कावळ्यांचा डब्बा
आणि आठवतात मिस्कीलपणे हसत असलेले आमचे आजोबा!

वाताहत

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे
की कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.
 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.